कृषि उत्पन्न बाजार समिती, वसमत ची स्थापना सन १९५६ मध्ये झाली आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण वसमत तालुका आहे. बाजार समितीची उपबाजारपेठ कुरुंदा येथे आहे. संचालक मंडळाच्या कारकिर्दीत बाजार समितीने उल्लेखनीय आर्थिक प्रगती केली आहे. वसमत बाजारसमिती आवारामध्ये प्रामुख्याने हळद,सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर या शेतमालाची आवक होते.